पेज

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

महा कॅरिअर पोर्टल

विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे 'महा कॅरिअर पोर्टल' 
वरील मुख्यपृष्ठ मध्ये 
"इ.९ली ते १२वी-महा कॅरिअर पोर्टल" 
या पेज वर उपलब्ध आहे.

महा कॅरिअर पोर्टल हे इ. ९ वी ते इ. १२ वी मध्ये 
शिकणाऱ्या मुला-मुलींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी 
आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्डचा उपयोग करा. 

हे करिअर पोर्टल आपणास करिअर विषयक माहिती
विविध व्यावसायिक कोर्सेस
अनेक शिष्यवृत्या तसेच महाविद्यालय शोधण्यास मदत करेल. 

विद्यार्थी सरल आयडी प्राप्त करण्यासाठी 
आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/
प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.

Note :- Students (Class 9-12) of Government and Government 
Aided Schools will be able to login
 
👉 महा कॅरिअर पोर्टल ची वेबसाईट वर जाण्यासाठी 
खालील Link वर click करा. 

👉 Maharashtra Career App 
डाऊनलोड करण्यासाठी 


घरीच रहा सुरक्षित रहा !


Stay Home....Stay Safe

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

WhatsApp-स्वाध्याय उपक्रम

विद्यार्थी मित्रांनो,
आत्ता तुम्हाला उपयुक्त अभ्यासाचे स्वाध्याय 
वरील वरील मुख्यपृष्ठ मध्ये 
"इ.१ली ते १०वी-स्वाध्याय उपक्रम" या पेजवर उपलब्ध

विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांचा अभ्यासाचे मूल्यमापन करता 
यावे या उद्देशाने सरकारने हा उपक्रम सुरु केला.   
 
यामध्ये WhatsApp द्वारे विद्यार्थ्यांना 
सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व 
इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा 
घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

स्वाध्याय हा उपक्रम मुख्यत: 
राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान 
वाढवण्याचे एक साधन म्हणून वापरला जात आहे. 

स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण 
करावा यासाठी पेजमध्ये दिलेला व्हिडीओ बघा.

स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यासाठी पेजमध्ये दिलेल्या 
WhatsApp लिंक वर क्लिक करा
आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा

घरी रहा सुरक्षित रहा !


Stay Home....Stay Safe

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

पहिली ते दहावी अभ्यासक्रमावर टेस्ट

 महत्वाची सुचना

विद्यार्थी मित्रहो, मोबाईल मध्ये कमी इंटरनेटचा वापर

कोणतेही ऍ नको, 

डायरेक्ट विषय  पाठ निवडा, 

पहिली ते दहावीचा अभ्यासक्रमावर टेस्ट द्या,

सर्व प्रकरणावर टेस्ट फोन मधून द्या, 

आपल्या स्मार्ट फोन मध्ये पहिली ते दहावीचे सर्व विषयाच्या 

प्रत्येक प्रकरणावर टेस्ट उपलब्ध करून दिले आहेत, 

  "हि Post इ. १ ली ते इ. १० वी  शिकणाऱ्या 

मुला मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे."

खालील निळ्या बटन ला टच करा.



Stay Home....Stay Safe

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

पहिली ते दहावी चा अभ्यासक्रम

 महत्वाची सुचना 

विद्यार्थी व पालक यांनी मोबाईल मध्ये कमी इंटरनेटचा वापरकोणतेही ऍ नको. 

डायरेक्ट विषय  पाठ निवडा पहिली ते दहावीचा अभ्यास सुरू करा. 

आपल्या स्मार्ट फोन वरून पहिली ते दहावीचे सर्व विषय, 

सर्व प्रकरणे फोन मधून शिका. 

खालील निळ्या बटन ला टच करा. 

हि Post इ. १ ली ते इ. १० वी  

शिकणाऱ्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे.



Stay Home....Stay Safe

दहावीचा अभ्यासक्रम

 महत्वाची सुचना 

विद्यार्थी व पालक यांनी मोबाईल मध्ये कमी इंटरनेटचा वापर, कोणतेही ऍ नको. 

डायरेक्ट विषय  पाठ निवडा दहावीचा अभ्यास सुरू करा. 

आपल्या स्मार्ट फोन वरून दहावीचे सर्व विषय, 

सर्व प्रकरणे फोन मधून शिका. 

खालील निळ्या बटन ला टच करा. 

हि Post इ. १० वी शिकणाऱ्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे.


Stay Home....Stay Safe

सोमवार, २० जुलै, २०२०

टिलिमिली- सह्याद्री वाहिनी


@ टिलिमिली
@ २० जुलै २०२० पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी “टिलिमिली” शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम सुरु होत आहे.
@ ज्यांच्या घरी TV नाही किंव्हा दूरदर्शनचे चॅनल दिसत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना 'मोबाईलवर हे चॅनल-सह्याद्री वाहिनी Live' बघता येईल.

मुलांना अभ्यास घरच्या घरी होण्यासाठी हे खूप उपयोग होईल.
त्यासाठी खालील “सह्याद्री वाहिनी” ह्या Image वर Click करावे. 

इयत्ता १ ली ते ८ वी चा टाईम बदल झाला.
नवीन टाईम पुढील प्रमाणे

➤  इयत्ता ५ वी ते ८ वी चा टाईम टेबल- ३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२०


➤  इयत्ता १ ली ते ४ थी चा टाईम टेबल- ३१ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२०



इयत्ता १ ली ते ८ वी चा टाईम बदल झाला.
जुना टाईम पुढील प्रमाणे




@ आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
@ पालकांनी आपल्या मुलांना हे चॅनल Live बघण्यासाठी मोबाइल उपलब्ध करून द्यावा.

बुधवार, १५ जुलै, २०२०

फिरता जिना



* फिरता जिना :
      (एस्कॅलेटर). एका पातळीवरून (वा मजल्यावरून) दुसऱ्या पातळीवर (वा मजल्यावर) प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे व क्षितिजसमांतर पातळीशी योग्य कोन करून  सतत फिरत राहणारे हे एक यांत्रिक साधन आहे. प्रवासी जिन्याच्या पायऱ्यांवर सामान्यतः एक ते तीन रांगा करून उभे राहतात व जिन्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार वरील वा खालील पातळीवर नेले जातात. 
          फिरत्या जिन्याने ताशी ५,००० ते १०,००० प्रवाशांची (म्हणजे विद्युत्‌ लिफ्टपेक्षा सु १० पट) वाहतूक करता येते. जिन्याची ही क्षमता जिन्याची रूंदी, वेग व जिन्यावर प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची संख्या घनता यांवर अवलंबून असते. अमेरिकेत जिन्याची प्रमाणभूत रूंदी ८१·३ सेंमी. व १२९·९ सेंमी. आणि वेग २७·४ मी. व ३६·६ मी. प्रती मिनिट ठरविण्यात आले आहेत (रेल्वे स्थानकावर वापरण्यात येणाऱ्या जिन्यांचा वेग ५४·८ मी. प्रती मिनिटपर्यंत असतो). वरील रुंदीचे जिने २७·४ मी. प्रती मिनिट वेगाने अनुक्रमे ८५ व १३५ प्रवासी प्रती मिनिट वाहून नेऊ शकतात. जिन्याचा क्षितिजसमांतर दिशेशी होणारा प्रमाणभूत कोन  ३०° ठरविण्यात आला आहे. प्रवाशांची संख्या निरनिराळ्या मजल्यांवर तसेच क्षणोक्षणी बदलणारी असली, तरी त्यांची वाहतूक फिरत्या जिन्याच्या साहाय्याने सुलभपणे करता येते. बदलत्या वाहतुकीच्या ओघाच्या दिशेनुसार जिन्याच्या फिरण्याच्या दिशा बदलता येते. बऱ्याचशा भुयारी रेल्वे स्थानकांवर फिरते जिने तीनतीनच्या गटाने बसविलेले असतात. त्यांपैकी दोन विरूद्ध दिशांनी चालविले जातात आणि तिसरा जिना गर्दीचा अधिक ओघ ज्या दिशेने असेल त्या दिशेने चालविला जातो.  
फिरत्या जिन्याने प्रामुख्याने सापेक्षतः कमी अंतरावर मोठ्या प्रमाणावरील प्रवाशांची वाहतूक केली जाते, तर विद्युत्‌ लिफ्टने अनेक (पण सापेक्षतः कमी) लोकांची मोठ्या अंतरावर वाहतूक करण्यात येते. थांबावे न लागता तत्काळ चालक सेवकाशिवाय, सुरक्षितपणे व सुलभपणे  अनेक मजली उंचीपर्यंत फिरत्या जिन्याने अरुंद वाहतूक करता येते. तसेच तो सापेक्षतः कमी जागेत मावणारा व चालविण्याचा खर्च कमी येणारा असल्यामुळे अनेक ठिकाणी (विशेषतः वस्तू भाडारांत) त्याने विद्युत्‌ लिफ्टची जागा घेतलेली आहे. मोठ्या विविध वस्तुभांडारांत निरनिराळ्या मजल्यांवरील वस्तू पाहण्यासाठी ग्राहकांना फिरता जिना अतिशय सोयीचा ठरला आहे. हवाई, रेल्वे, बस वाहतूक स्थानके, हॉटेले, कार्यालयीन इमारती, वस्तुसंग्रहालये, शैक्षणिक संस्था, रूग्‍णालये, क्रीडांगणे अशा ठिकाणी गर्दीच्या वेळी लोकांच्या वाहतुकीसाठी फिरते जिने मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात. 

* इतिहास : 
         फिरत्या जिन्यासंबंधी १८५९ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत एक एकस्व (पेटंट) देण्यात आले होते पण त्याचा उपयोग करण्यात आला नाही. सुरूवातीचा फिरता जिना म्हणजे केवळ एक वाहक निरंत पट्टा होता. व त्यावर आधाराकरिता पाचरींची योजना केलेली असे. जेसी डब्ल्यू. रेनो व चार्ल्‌स डी. सीबर्गर यांनी दोन निरनिराळ्या प्रकारच्या फिरत्या जिन्यांचा १८९० च्या सुमारास शोध लावला. या दोन्ही जिन्यांच्या अभिकल्पांत (आराखड्यांत) दोष होते. रेनो पाचर प्रकारात कमी चढाचा कोन  वापरण्यात येत असल्यामुळे त्याला  जागा जास्त लागत असे. सीबर्गर प्रकारात जिन्याच्या एका कडेने चढावे वा उतरावे लागत असल्यामुळे तो काहीसा धोक्याचा होता. ओटिस एलेव्हेटर कंपनीने या दोन्ही प्रकारच्या जिन्यांचे हक्क विकत घेतले. याँकर्स येथील ओटिस कंपनीच्या कारखान्यात पहिले फिरते जिने तयार करण्यात व वापरण्यात आले. त्यांपैकी एक कारखान्यात प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी १९०२ पर्यंत वापरण्यात येऊन नंतर शिकागो येथील एका वस्तुभांडारात बसविण्यात आला. सार्वजनिक वापरातील पहिला फिरता जिना पॅरिस येथील १९०० साली भरलेल्या प्रदर्शनात ओटिस कंपनीतर्फे बसविण्यात आला. त्यानंतर न्यूयार्क येथील भुयारी रेल्वे स्थानकांवर व ब्‍लुमिंगडेल या वस्तुभांडारात फिरते जिने वापरात आले. भारतात मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ एक फिरता जिना बसविण्यात आलेला आहे. 
       ओटिस कंपनीने १९२१ मध्ये रेनो व सीबर्गर यांच्या अभिकल्पातील पायऱ्यांची चांगली वैशिष्ट्ये एकत्र करून आडव्या पाचरीसारख्या पायऱ्या असलेले जिने तयार केले. या जिन्यात एका फणीसारख्या दाते असलेल्या पट्टाच्या (पत्र्याच्या) साहाय्याने प्रवाशाचे पाय हळूच उचलले जाऊन तो जिन्याच्या रमण्यावर सुरक्षितपणे उतरू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली (असा पट्ट अद्यापही वापरण्यात येतो). चढाचा कोन ३०° ठरविण्यात आला व हा कोन पायऱ्यांच्या मापाच्या दृष्टीने योग्य असल्याचे दिसून आले. त्यानंतर १९३२-३३ मध्ये वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक एलेव्हेटर कंपनीने विद्युत्‌ जिना तयार केला. त्यात आडव्या पायऱ्यांवर अरुंद पाचरी बसविलेल्या होत्या व धातूचा कठडाही होता. वेग वाजवीपेक्षा जास्त होणे, साखळ्या तुटणे इ. धोक्याच्या प्रसंगी जिना तत्काळ थांबावा म्हणून विविध सुरक्षा उपाय योजण्यात आले होते. आवाजरहित कार्य, चढण्या-उतरण्याची सुलभता व सुधारलेले बाह्यरूप यांमुळे नंतर फिरत्या जिन्यांची लोकप्रियता वाढीस लागली. १९४० सालानंतर फिरत्या जिन्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रमाणीकरण झाल्यामुळे त्यांची सापेक्ष किंमत कमी होण्यास व वाढत्या विविध प्रकारांच्या इमारतींमध्ये त्यांचा वापर होण्यास मदत झाली.  

* रचना व कार्य : 
         फिरता जिना हा दोन निरंत साखळ्यांना बांधलेल्या पायऱ्यांच्या मालिकेचा बनलेला असतो. या पायऱ्या आणि साखळ्या एका पोलादी कैचीत वा चौकटीत बंदिस्त केलेल्या असतात. ही चौकट माथ्याच्या व तळाच्या जागी इमारतीच्या सांगाड्याला पक्की जोडलेली असते. साखळ्या जिन्याच्या तळाशी व माथ्यावर  असलेल्या दातेरी चक्रांवरून जातात. माथ्यावरील दातेरी चक्रांना पायऱ्यांच्या रुंदीनुसार १० ते २० अश्वशक्तीचे एक विद्युत्‌ चलित्र (मोटर) प्रदान वेग कमी करणाऱ्या दंतचक्रमालिकेद्वारे जोडलेले असते. त्यामुळे पायऱ्यांना अखंड व एकसारखी गती प्राप्त होते.
         प्रत्येक पायरी म्हणजे एका अलग गाड्यासारखी (ट्रॉलीसारखी) असून तिचा आकार इंग्रजी उलट्या L अक्षरासारखा असतो. प्रत्येक पायरीला चार छोटी चाके जोडलेली असतात. यांतील वरची चाके खालच्या चांकापेक्षा एकमेकांपासून दूर बसविलेली असतात व ती वेगळ्या रूळजोडीवरून फिरतात. वरची चाके साखळ्यांना जोडलेली असतात. जिन्यांच्या जवळजवळ पूर्ण लांबीभर दोन्ही रूळजोड्या जिन्याच्या चढाइतकाच कोन करतात परंतु माथ्यावरील पायऱ्या परतीच्या दिशेने जिन्याच्या खालच्या बाजूने जाण्यास सुरूवात होण्याच्या जागेपासून थोड्या अंतरावर आतील रूळजोडी बाहेरील रूळजोडीच्या खाली येईल अशी रचना केलेली असते (जिन्याच्या तळाशी यासारखीच रचना केलेली असते). यामुळे हळूहळू पायऱ्यांची उंची कमी होऊन शेवटी दोन-तीन पायऱ्या जमिनीच्या पातळीत येऊन जिन्यावर सुलभपणे चढण्यास व उतरण्यास सपाट फलाट तयार होतो.

* फिरता जिना : 
(अ) सर्वसाधारण रचना :
       (१) पायरी, (२) पायऱ्या जोडलेली साखळी, (३) पायरीची वरची चाके, (४) पायरीची खालची चाके, (५) आधारपट्टा, (६) आधारपट्ट्याला ताण देणारी प्रयुक्ती, (७) आधारपट्ट्याला गती देणारे चाक, (८) रूळ, (९) फणीसारखा पट्टा, (१०) चालक यंत्रणा व गतिरोधक, (११) विद्युत् चलित्र, (१२) खालचा रमणा, (१३) वरचा रमणा (आ) पायरीची रचना : 
      (१) पायरी, (२) खालची चाके, (३) आतील रूळ, (४) वरची चाके, (५) बाहेरचा रूळ, (६) निरंत साखळी (इ) जिन्याच्या माथ्यावरील पायऱ्यांची मांडणी : 
      (१) पायरीची खालची चाके, (२) रूळ, (३) वरची चाके, (४) साखळी 
(ई) माथ्यावर सपाट फलाट तयार होताना होणारी पायऱ्यांची हालचाल : 
      (१) आतील रूळ, (२) बाहेरील रूळ, (३) वरची चाके, (४) खालची चाके.

        जिन्याच्या दोन्ही बाजूंना कठडा बसविलेला असून त्यामुळे प्रवाशांना आधार मिळतो व जिन्याची यंत्रणा त्यात झाकून टाकता येते. प्रत्येक कठड्याच्या वरती आधारासाठी हाताने धरण्याकरिता कॅनव्हास व रबर यांपासून तयार केलेला एक लवचिक पट्टा असून तो पायऱ्यांइतक्याच वेगाने व त्याच दिशेने फिरत असतो. हे पट्टे जिन्याच्या चलित्राच्या चालक दंडाला दंतचक्र व साखळी यंत्रणेने जोडलेले असतात. पट्टा ताठ राहण्यासाठी त्यावर कठड्यातील एका चाकाद्वारे ताण दिलेला असतो व त्यामुळे तो वरच्या व खालच्या कप्प्यांवरून घसरत नाही. 
साखळ्या तुटणे, जास्त भार येणे अथवा गतिमान पायरीची कडा व स्थिर काठ यांमध्ये एखादी वस्तू अडकणे यांसारख्या कारणांनी यांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास किंवा विद्युत्‌ यंत्रणेत दोष उद्‌भवल्यास जिन्यांची गती तत्काळ थांबावी अशा सुरक्षा योजना केलेल्या असतात. चलित्राच्या चालक दंडावर एक रॅचेट चाक [ रॅचेट चाक खिटी] बसविलेले असते जर एखादी साखळी तुटलीतर एक खिटी रॅचेट चाकाच्या दात्यांत बसते व त्यामुळे जिना थांबतो आणि त्याच वेळी चलित्रही आपोआप थांबते. जिन्याच्या बांधणीत ज्वालाग्राही नसलेले पदार्थच वापरण्यात येतात. आणीबाणीच्या वेळी जिन्याची गती थांबविण्यासाठी कठड्यात खालच्या व वरच्या नैल्यामध्ये स्विच बसविलेले असतात. जिना सुरू करण्यासाठी विशिष्ट किल्लीची आवश्यकता असते. 

* फिरते जिने इमारतीत दोन प्रकारे बसविण्यात येतात. 
         (१) आडव्यातिडव्या : यात सामान्यतः वरच्या व खालच्या दिशांनी फिरणारे जिने एकमेकांशेजारी ६०° चा कोन करून बसविलेले असतात. या व्यवस्थेत किमान जागा लागते व सामान्यतः हाच प्रकार वापरात आहे. (२) समांतर : यात वरच्या व खालच्या दिशांनी फिरणारे जिने एकाच तिरप्या प्रतलात बसविलेले असतात. या व्यवस्थेत अधिक जागा व्यापली जाते. 

    * संकलन *
शरद शिंदे

शनिवार, ६ जून, २०२०

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक



👁शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
   
६ जून १६७४

       छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.
       ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
       राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
👁शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…
        हेन्री ऑक्सएन्डन (HENRY OXENDEN)च्या डायरीतील माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.
       शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे. हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.
* ३० मे १६७४-
       हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.
* ३१ मे १६७४-
       या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.
* १ जून १६७४-
       या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.
* २ जून १६७४-
       २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.
* ३ जून १६७४- शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.
*  ४ जून १६७४- निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.
*  ५ जून १६७४ व ६ जून १६७४-
      या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)
       दिनांक ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.
       हे सगळे सोहळे, विधी, संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक ६ जून १६७४ पहाटे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सूर्योदयाच्या ३ घटिका पूर्व शिवाजी महाराज, सोयराराणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम आणि नजराणे देत होते आणि सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता, डोळ्यांतील अश्रूंमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्ये पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला, मावळ्यांमध्ये मस्ती करून, खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतः सोबत त्यांच्याही मनात जागविणारा, रयतेचा प्रेमळ, कनवाळू आणि आपल्या सर्वांचा लाडका शिवबा या दिवशी ‘श्रीमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले होते.
👁 शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?
     हेन्री हा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीत नमूद करतो कि, “मी पाहतोय राजे आपल्या भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. त्यांच्याजवळ मूल्यवान पोशाख केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान व अनेक ब्राह्मण उभे होते. आम्ही (हेन्री यांनी) आणलेला नजराणा देण्यासाठी नारोजी पंडितांनी आम्हाला पुढे केले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला आणि आम्ही जाताच आम्हाला पोशाख देऊन रजा दिली.
       त्या सिंहासनावरील खांबांवर मुसलमान पद्धतीची अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत एक सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून शोभत होती. गडावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केले होते आणि दोन पांढरे शुभ्र घोडे देखील उभे होते. गडाची वाट इतकी बिकट असतांना हे हत्तीसारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.”
    🚩 हर हर महादेव...! 🚩
         जयहिंद
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏


* संकलन *
 शरद शिंदे.