माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचा भरमसाठ साठा रोज
आपल्या मोबाईल वा इतर माध्यमातून येत असतो. यात शिक्षण क्षेत्र
देखील अपवाद नाही. या दररोजच्या येणाऱ्या माहितीचे योग्य प्रकारे
नियोजन करुन सुव्यवस्थित जपणुक करुन ठेवल्यासच त्या माहितीचा
उपयोग होऊ शकतो. अन्यथा या माहितीच्या जाळात आपणास हवी
असणारी माहिती गहाळ होण्याची शक्यता असते. या जाणीवेतून शिक्षण
विभागातील अत्यावश्यक व नियमित शालेय उपयोगी येणाऱ्या माहितीची
सॉर्टींग करुन सर्वांना सहज उपलब्ध होईल,अशा पद्धतीने एकाच ठिकाणी
संग्रहित करण्याची कल्पना सुचली. या करिता ब्लॉगचा पर्याय सुचला.
सध्या शिक्षण विभागातील विविध माहितीचा पुरवठा करणाऱ्या
अनेक वेबसाईटस् उपलब्ध आहेत. एक ना अनेकविध वेबसाईटस् चे पर्याय
आहेत.परंतु अजूनही थेट शिक्षकांपर्यंत पोचण्यात सदर वेबसाईटसना यश
मिळाले नाही केवळ माहिती व तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान व नियमित संगणक
व इंटरनेटशी संबंध असणाऱ्या शिक्षकांपुरतेच सदर वेबसाईटसचा वापर
होताना दिसून येत आहे. परंतु शिक्षणात माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर
करून घेऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे असेल तर
तंत्रज्ञानाचे सामान्य ज्ञान असणाऱ्या शिक्षकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे
त्याकरिता ब्लॉग हा उत्तम पर्याय आहे, असे मला वाटते. त्यात ब्लॉगचे
सर्वात महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे ब्लॉग हा शिक्षकाच्या आवश्यकतेनुसार
तयार केलेला असतो व त्यात वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल ही केला
जाऊ शकतो.
@ ब्लॉग हा उत्तम पर्याय का आहेत्यासाठी खालील दिलेल्या 'Click Here' या नावावर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा