मित्र हो,
आज जागतिक परिवार
दिन म्हणून हे थोडेसे माझ्या मनातले...
मी माझा, माझे मला ...
हा स्वार्थ विचार झाला.
माणूस म्हणून जगताना जर आपण
हाच विचार पेरत आणि जोपासत राहिलो
तर परिवार कुटुंब ही संकल्पना नामशेष
होण्याची शक्यता आहे.
रोजचे जीवन जगताना आपल्याला
अनेकदा सहकार्याची मदतीची गरज भासते.
आपलीही कोणालातरी मदत हवी असते.
म्हणूनच समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था
आपल्या आनंदाने जगण्याचे मुख्य मार्ग आहेत.
पण केवळ आपल्याच कुटुंबाचा विचार करणे हा ही एक स्वार्थच ठरतो. संपूर्ण मानवजातीला आपलाच परिवार मानणे ही उदात्ततेची पराकोटी झाली.
आपल्या आजूबाजूला जर आपण डोळे आणि कान उघडे ठेऊन पाहिले तर अनेक सामाजिक संस्था मानवजातीलाच आपला परिवार समजत कार्य करताना दिसतील.
यात अनाथाश्रमे ,वृद्धाश्रमे, गोशाळा, मतिमंद गतीमंद बालकांची संस्था, महिलांसाठी कार्यरत संस्था, इतकेच नव्हे तर पर्यावरण संतुलनासाठी झटणार्या संस्था मोठ्या निष्ठेने मानवी कल्याणासाठी झटत आहेत.
त्यांच्या या कार्यात आपला सहभाग किती ? कसा? हे ज्याचे त्याने आपल्या क्षमतेनुसार ठरवावे. पण अशा कार्याला नुसत्या टाळ्या वाजवणारेच आज अधिक दिसतात ही खेदाची बाब आहे.
आपला खारिचा वाटा आपण या पारिवारिक संस्थांना नक्कीच देवू शकत असतो. त्यासाठी फार काही नाही फक्त आपली सामाजिक जाणिव थोडी प्रगल्भ व्हायला हवी.
जग सुंदर आहे ते आणखी सुंदर नक्की करता येईल. आज जागतिक परिवार दिनी संकल्प करू. जग सारे सुंदर करू.
तुमचाच
शरद.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा