पेज

शुक्रवार, २२ मे, २०२०

राजा राममोहन रॉय

राजा राममोहन रॉय 
( जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२ ) :-
      हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
      तिथे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी जिच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, त्या आपल्या आईच्या आग्रहामुळे, हिंदु धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी'वेदान्त' ग्रंथ
नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.
      घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले.
मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले. राजा राममोहन राॅय ह्यांनी त्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरातउल अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.
राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

* संकलन *
 शरद शिंदे.

गुरुवार, २१ मे, २०२०

राजीव गांधी

* राजीव गांधी
(२० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१):-
      हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो.१९८४ ते २ डिसे. १८८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)
      राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंग्लंड एअरलाइन्स मध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते.दरम्यान इंग्लंडमधील
केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स.१९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स.१९८४ मध्ये पंतप्रधान बनले.
      राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.  इ.स.१९८८मध्ये त्यांनी श्रीलंकेत
शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती
लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात
 त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स.१९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
      राजीव गांधी त्यानंतरही कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स.१९९१ च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला.आजोबा
जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स.१९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स.१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स.१९४९ च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स.१९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
       राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स.१९६१ ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स.१९६५ च्या जानेवारीत त्यांचीओळख इटलीच्या
अँटोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये
 भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स.१९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एअरलाईन्स वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना इ.स.१९७० मध्ये राहुल तर इ.स.१९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली.
       इ.स.१९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि कॉंग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स.१९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक कॉंग्रेसचे प्रमुख बनले.
       ३१ ऑक्टोंबर इ.स.१९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत कॉंग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. याबाबत दिल्लीत एका समारोहात राजीव गांधी काढलेले उद्गार पुढील प्रमाणे. “Some riots took place in the country following the murder of Indiraji. We know the people were very angry and for a few days it seemed that India had been shaken. But, when a mighty tree falls, it is only natural that the earth around it does shake a little.” जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे. या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने कॉंग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच.त्यांनी
रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.
      राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली.खासकरुन
संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.
      २१ मे१९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

* संकलन *
 शरद शिंदे.

बुधवार, २० मे, २०२०

मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर (Malhar Rao Holkar) 
 *( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ )*
      हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या
मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते.
बाळजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.
     मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला.
     मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते.अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.
     मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.
     उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली. मात्र, मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला.
      मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.
     जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.
     पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६० रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे.पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.
     पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता.
     अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

* संकलन *
 शरद शिंदे.

मंगळवार, १९ मे, २०२०

जमशेदजी टाटा

🌸 जमशेदजी टाटा

आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग  समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन

      जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.

* सुरुवातीचे जीवन
      जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.
      १८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.

* व्यवसाय
      १८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.

* टाटा स्टील
      टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.

* टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था
      बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.
टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.

* व्यक्तिगत जीवन
      टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.

* मृत्यू
      १९०० साली व्यवसाया निमित्त जर्मनी ला असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना इंग्लंड मधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

* वारसा
      झारखंडमधील साचि गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. गाव गावात वाढला आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.

* पुस्तके
आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं
दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:
टाटायन-गिरीश कुबेर. -टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक

* संकलन *
 शरद शिंदे.

सोमवार, १८ मे, २०२०

छत्रपती थोरले शाहु महाराज

*  छत्रपती थोरले शाहु महाराज 
ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे रुपांतर मराठा साम्राज्यात केले
     १८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले . हाच संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु महाराज इतिहास मध्ये अजरामर झाले. त्याचवेळेस लाखो सेनासागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता . संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते . नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला. त्यावेळी हा संभाजीपुत्र अवघा आठ वर्षाचा होता . रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई व संभाजीपुत्र औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले. तरीही राजाराम महाराजांचा नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता.

ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन, औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले .
     दरम्यानच्या दिर्घ काळात ( १६८९ ते १७०७ ) शाहु हे मुघलांच्या कैदेतच होते . औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर, तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले संभाजीपुत्र शिवाजी उर्फ थोरले शाहु ह्यांची सुटका झाली. आणि खऱ्या अर्थाने शाहु महाराज इतिहास घडण्यास सुरुवात झाली

छत्रपती शाहु महाराज इतिहास
     अजिंक्यतारा किल्ल्यावर शाहु १२ जानेवारी १७०८ या दिवशी छत्रपती जाहले .
पण या १८ वर्षात शाहुंना घडविणार्या मातोश्री येसुबाईसाहेब यांचे आभाळाएवढे कर्तृत्व आम्ही लक्षात घ्यायला हवे . छत्रपती शाहू महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्यातील सुवर्ण काळ मानला जातो. छत्रपती शाहूंच्या मुत्सदी राजकारणाने अनेक मराठी घराणी उदयाला आली.

     सामान्यातला असामान्यत्व उफाळून आलं. शाहू महाराजांनी या घराण्यातील शूर पुरुषांचा कौशल्याने उपयोग करून घेतला, त्यांच्या गुणाची कदर केली, त्यांना उत्तेजन देऊ केले, वेळोवेळी त्यांची पाठ थोपटली. याचाच परिणाम म्हणून हे पुरुष मोठमोठी धडाडीची राजकारण स्वतःच्या ताकदीवर पेलून, शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याचा रोपट्याला, स्वतःच्या रक्तमांसाच खतपाणी घालू लागले. बघता बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला. तो फोफावला. त्याच्या पारंब्यानी संबंध हिंदुस्थानावर आपली छाया धरली.
छत्रपती शाहूंनी अगदी विलासी आयुष्य जगले. मराठा साम्राज्याचे छत्रपती असूनही त्यांचे अगदी साधे राहणीमान होते.

छत्रपती शाहु महाराज सरदार
शाहूंच्या उजव्या हाताला

१)  खंडेराव दाभाडे (सेनापती) : 
       शाहूंच्या महान सेनेचे नेतृत्व करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, खंडेराव दाभाडे. उत्तरेमध्ये गुजरात व तत्सम प्रातांमध्ये पराक्रम व वचक ठेवण्याचं काम खंडेराव दाभाडे यांनी केलं.

२)  बाजीराव प्रधान :
       शाहू महाराजांच्या विशेष मर्जीतले. पराक्रमी व धाडसी व्यक्तिमत्व. उत्तरेतील अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवत मराठा साम्राज्य वाढीला मोठा हात त्यांनी लावला.

३)  राणोजी शिंदे :
       उत्तरेतील ग्वाल्हेर व जवळील प्रांतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला.

४) दमाजी गायकवाड :
       उत्तर हिंदुस्थानामध्ये पराक्रम व मर्दुमकी गाजवली. खंडेराव दाभाडे यांच्या नंतर गुजरात व राजस्थान भागामध्ये त्यांनी वचक ठेवला.

डाव्या हाताला

१)  पिलाजीराव जाधवराव (मुख्य सल्लागार) :
       छत्रपती शाहूंच्या प्रत्येक मोहिमेचा “मुख्य सूत्रधार”. भारतभर मराठा रियासतीच्या चालू असलेल्या हरेक मोहिमवर लक्ष ठेवण्याचे व योग्य सल्ला देण्याचे काम पिलाजीराव जाधवराव करत. छत्रपती शाहूंच्या दरबारामध्ये त्यांना विशेष स्थान होत.

२)  मल्हारराव होळकर :
       माळव्याचे सुभेदार म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ओळख. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत फैलावण्यासाठी होळकरांचे मोठं योगदान आहे. उत्तरेमध्ये मल्हारबाबांचा मोठा दबदबा होता.

३)  फतेसिंह भोसले :
       दक्षिणेमध्ये मराठी साम्राज्याचा विस्तार भोसले घराण्याने केला. छत्रपती शाहूंच्या विशेष मर्जीतले, फतेसिंह भोसले. दक्षिणेतील भोसले घराण्याची भारताच्या सांस्कृतिक ठेव्यातील भरघोस योगदान सर्वश्रुत आहे.

४)  उदाजी पवार :
       धारच्या पवार घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. उत्तरेतील हरेक मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग व पराक्रम.

छत्रपती थोरले शाहु महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

* संकलन *
 शरद शिंदे.

रविवार, १७ मे, २०२०

जागतिक दूरसंचार दिन

१७ मे
*  जागतिक दूरसंचार दिन
     प्रत्येक वर्षी १७ मे रोजी, जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. तर आम्ही जाणून घेऊ जागतिक दूरसंचार दिवसाचा इतिहास आणि हा का म्हणून साजरा करण्यात येतो येथे सांगण्यात येत आहे. संचारच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि जगभरात याचे माहिती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. म्हणून हा दिवस संचारच्या विकासासाठी समर्पित आहे. 
     टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी 17 मे 1865ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. यानिमित्ताने हा दिवस 1973 पासून साजरा होऊ लागला. मात्र 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. या श्रेणीत मोबाइल, इंटरनेट आले. यामुळे आतापर्यंत 'जागतिक दूरसंचार' नावे साजरा होणारा हा दिन जागतिक दूरसंचार व माहिती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2006 मध्ये घेण्यात आला. तेव्हापासून हा दिन दरवर्षी साजरा होत आहे.
      तसेच हा दिवस या हे ही संकेत देतो की आमच्या जीवनात संचार किती महत्त्वपूर्ण आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाला देखील प्रोत्साहित करतो.

* दूरसंचार काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?  
      एक संचार जो केबल, टेलीग्राफ किंवा प्रसरण द्वारे दुरून केला जातो त्याला दूरसंचार म्हणतात. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आम्ही म्हणू शकतो की हे सिग्नल, संदेश, शब्द, लेखन, प्रतिमा आणि ध्वनी किंवा कुठल्याही प्रकारच्या माहितीचे संचारणं आहे. तंत्रज्ञानाच्या बगैर संचार सहभागांमध्ये  माहितीचे आदान प्रदान शक्य नाही आहे. 
      घरगुती लॅण्डलाइनची संख्या झपाट्याने घसरत आहे. मोबाइल येण्याआधी ज्यांच्याकडे लॅण्डलाइन होते, तेच घरगुती फोन सध्या वापरात असल्याचे दिसून येते. इंटरनेट अर्थात ब्रॉडबॅण्ड सेवा ही लॅण्डलाइनशी संलग्न आहे. त्यांच्याकडेच आज लॅण्डलाइन आहेत. मात्र, यामध्ये देखील आता राऊटरचा पर्याय आहे. हे राऊटर वायरसह किंवा वायरविना पुरविणाऱ्यादेखील 15 हून अधिक कंपन्या आहेत. सोबतच विविध मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे हॉटस्पॉट डिव्हाईस आहेत. सीम कार्डवरील इंटरनेट हॉटस्पॉटद्वारे जोडण्याची सेवा उपलब्ध आहे. यामुळेच ब्रॉडबॅण्डसाठी लॅण्डलाइन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकूणच दूरसंचार असे नाव असलेले हे क्षेत्र आज झपाट्याने केवळ भ्रमण संचार होत आहे. येत्या काही वर्षांत सर्वत्र केवळ मोबाइल तंत्रज्ञान असेल, असे चित्र आहे.

संचार लॅटिन शब्द communication मधून घेण्यात आला आहे. तसं तर संचारामध्ये विभिन्न तंत्रज्ञान सामील आहे, म्हणून बहुसंख्याक रूपात दूरसंचारचा उपयोग केला जातो.

* संकलन *
 शरद शिंदे.

शनिवार, १६ मे, २०२०

वीर मुरारबाजी देशपांडे

* वीर मुरारबाजी देशपांडे
जन्म : १६१६ (महाड)
वीरगती : १६ मे १६६५(पुरंदर)

      मुरारबाजी हे मराठा सैन्यातील वीर होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.

🏇 सैनिकी कारकीर्द
      १६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव.
मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले, पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.
      इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेनी दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी १६६५ च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला.दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता. जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल. दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली. वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली. १५ दिवस जिवाच्या आकांताने किल्ला झुंजवला, पण दिलेरखानांच्या तोफांच्या मार्‍यापुढे गडाचा वायव्य बुरूज ढासळला आणि गड दिलेरखानाच्या ताब्यात गेला.  मुघलांच्या लांबपल्ल्याच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची! पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता. पण मुरारबाजी याही अवस्थेत तो तडफेने लढवत होते.
      १६६५ च्या आषाढातील तो एक भयाण दिवस…… १६ मे १६६५ या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सातशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे असा हा विचार होता. हा विचार की अविचार? त्याला एक कारणही होतेच. कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते. एकच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. हे मुरारबाजींना माहीत होते. हीच कल्पना आताही वापरली तर? नाहितरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल. मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला. मुरारबाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले , ‘ अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! ‘
हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ‘ मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय ?’
आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला. धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला.बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.
      त्याने दिलेल्या लढ्याचे सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे –
‘सात हजार पठाण आणि मुठभर मावळे. पण पहिल्या हल्ल्यातच पांचशे पठाण लष्कर ठार जाहालें. खासा मुरार बाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला. तेंव्हा दिलेरखान बोलिला ‘अरे तूं कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नांवाजितों.’ त्यावर मुरार बाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो कीं काय?’ असे म्हणत तो खानावर चालून गेला. हातघाईचे युद्ध जहाले. तोच खानानें आपले आगें कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला ‘असा शिपाई खुदाने पैदा केला!’ मुरारबाजीबरोबर तीनशें माणूस ठार जाहालें’  

🛕 समाधी
      मुरारबाजी देशपांडे यांची समाधी पुरंदर किल्ल्यावर आहे.                         

🏰  पुरंदर किल्ल्याचा इतिहास
      पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव प्राप्त झाले.

*  या किल्ल्याचे इतिहासातील नोंदी यादव पुर्वा काळापासून आढळतात. या किल्यावर यादवांचे राज्य होते.
▪️  इसवी सन १३५० मध्ये बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.
▪️  इसवी सन १३८० बहामनी राज्याकडून किल्ला दुरुस्ती. शेद्र्या बुरुंज उभारणीत नाकनाथ व देवकी या नवविवाहित जोडप्याचा बांधकामात गाडून बळी
▪️  इसवी सन १४८६ अहमदनगर निजामशाहीचे किल्ल्यावर राज्य
▪️  इसवी सन १५९६ निजामशाहीने मालोजीराजाना जहागिरीत किल्ला दिला
▪️  इसवी सन १६२९ किल्ला आदिलशाही कडे
▪️  इसवी सन १६४७ पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू. त्याचे मुलांमधील वादात मध्यस्ती करून शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराजात आणला. स्वराज स्थापनेच्या सुरवातीच्या कालखंडात महाराजांचे वास्तव्य याच गडावर. स्वराज्याचे सुरवातीचे हालचाली येथूनच.
▪️  इसवी सन १६४८ पहिली लढाई याच किल्यावरून कूच करून लढली व बेलसर येथे विजय मिळवला.
▪️  १४ मे १६५७ राणी सईबाई याच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म
▪️  राणी सईबाई यांचे निधनानंतर कापूरहोळच्या धाराऊ गाडे यांनी दुधमाता बनून संभाजी राजेंना वाढविले.
▪️  इसवी सन १६६० पुरंदर वरून कूच करून पुण्यातील लालमहालात शाहिश्ते खानाची बोटे तोडली.
▪️  ३० मार्च १६६५ पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाचा वेढा
▪️  १४  एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडला, पुरंदरावर मोघलांचा हल्ला.
▪️  एप्रिल, मे १६६५ पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला, वेढा तोडण्यासाठी मुरारबाजी देशपांडेंचे प्रयत्न, वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण. ( मुरारबाजी जन्म -१६१६, महाड ) मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला.
▪️  १३ जुन १६६५ पुरंदरच्या पायथ्याशी जयसिह व शिवराय चर्चा होऊन पुरंदरचा तह. किल्ला मोघलांचे ताब्यात.
▪️  ८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराजात आणला.
▪️  इसवी सन १६८९ किल्ला मुघलांकडे. औरंगजेबाने किल्लाचे नाव आझमगड ठेवले
▪️  इसवी सन १६९१ किल्ला स्वराज्यात परत
▪️  इसवी सन १७०५ किल्ला मुघलांकडे
▪️  इसवी सन १७०५ भोरचे पंत सचिवानी किल्ला मुघलांकडून परत मिळवला
▪️  इसवी सन १७०७ किल्ल्यावर छत्रपती शाहूचे वास्तव्य
▪️  इसवी सन १७१३ छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्त्र दिली, पेशवे परिवाराचा किल्ल्यावर निवास.
▪️  इसवी सन १७२७ चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली.
▪️  इसवी सन १७६४ गडकरी अत्र्यान विरुद्ध जुन्या गडकऱ्यांचे बंड. मजूर म्हणून किल्ल्यात प्रवेश, गवतात लपविलेल्या तलवारींनी हल्ला. गडावर कब्जा.
▪️  इसवी सन १७७४ नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नी गडावर निवासास, १८ एप्रिल १७७४ सवाई माधवरावांचा जन्म, वयाचे ४० व्या दिवशी पेशवे पदाची वस्त्र, पेशवाईचा कारभार गडावरून.
▪️  इसवी सन १८१८ गड इंग्रजांचे ताब्यात
▪️  इसवी सन १९६१ गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने सुरु केली. तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे हस्ते उद्घाटन.
▪️  १९  एप्रिल १९७० मुरारबाजी पुतळ्याचे अनावरण
▪️  इसवी सन १९७९ किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने हलवली.       

    🚩 हर हर महादेव 🚩
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

* संकलन *
 शरद शिंदे.

स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल

* स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल
१६ मे १९९२
        मानवाला अवकाशात झेपावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे अंतरीक्ष यान होय. मागील ५० वर्षात अमेरिका व रशिया या दोन देशांनी वेगवेगळे अवकाशयाने तयार करून त्यांचा वापर सुर्यमालेतील ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी केला आहे. अपोलो यानांनी तर थेट चंद्रावर पोहचुन मानवी यशाचा झेंडा रोवला आहे. अशा या अंतरीक्ष यानांच्या मालिकेतील सर्वात आगळे-वेगळे यान म्हणजे अमेरिकेचे स्पेस शटल होय. अवकाश स्थानकांचा विकास व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी स्पेस शटलचा वेळोवेळी वापर करण्यात आला आहे. स्पेस शटल हे विमान आणि रॉकेटचे एकत्रीतपणे तयार केलेले अंतरीक्षयान होते. त्याचा एका अवकाश मोहिमेनतंर परत वापर करणे शक्य होत असे. सुरवातीला चार स्पेस शटलची निर्मिती केली गेली होती ते म्हणजेच
१) कोलंबिया
२) डिस्कव्हरी
३) अ‍ॅटलँटिस
४) चॅलेंजर.
      १९८१ साली कोलंबिया या स्पेस शटलने पहिल्यांदा उड्डांन घेतले. चेलेंजर या यानाला १९८६ साली अपघात झाला व त्याच्या जागेवर इंडीएव्हर या नवीन स्पेस शटलचा समावेश करुन घेण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये कोलंबिया या यानाला देखील अपघात झाला. स्पेस शटलविषयी थोडं:

१) गडद नारंगी रंगाची टाकी :
      स्पेस शटलच्या मुख्य इंजिनला द्रवरुप हायड्रोजन व ऑक्सीजन इंधन पुरवण्यासाठी असे. दोन पांढर्‍या रंगाचे रॉकेट्स म्हणजेच सॉलिड रॉकेट बुस्टर्ससह इंधन टाकी जोडलेली असते. ही इंधनाची टाकी फक्त एकदाच वापरली जात असे.

२) सॉलिड रॉकेट बुस्टर्स : 
      दोन पांढर्‍या रंगाचे रॉकेट्स हे इंधन टाकीच्या दोन्ही बाजुस जोडलेले असे. स्पेस शटलच्या उड्डानानंतर ४६ कि.मी वर गेल्यावर त्यातील इंधन संपल्यानंतर ही दोन्ही रॉकेट्स स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे. त्यानंतर त्यात असणार्‍या पॅराशुटच्या साहाय्याने रॉकेट्स पृथ्वीवर पडल्यानंतर परत वापर करण्यासाठी गोळा केली जात असे.

३) स्पेस शटलचे इंजिन :
      आत्तापर्यंत सर्वात आधुनिक पद्धतीचे तीन इंजिन स्पेस शटलच्या मागील बाजुस त्रिकोणीय आकारात बसवलेली असत. उड्डाणाच्या वेळी प्रथम उजव्या बाजुचे, नंतर डाव्या बाजूचे व शेवटी दोहामधील तिसरे इंजिन सुरू होत असे. विशिष्ठ कक्षेत पोहचल्यानंतर हे इंजिन बंद होत असे व त्यानंतर इंधन टाकी देखील स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे.

४) अंतरीक्षयान : 
      पांढर्‍या रंगाचे विमानासारखे दिसणारे यान हे मुख्यतः अ‍ॅल्युमिनियम पासुन बनलेले होते आणि सुर्यापासुन व वातावरणातील वायुकणांशी घर्षन झाल्यानंतर तयार झालेल्या प्रचंड उष्णतेपासुन सरंक्षण होण्यासाठी त्याभोवती एक विशिष्ठ आवरण असे. यामध्ये अंतराळवीर, अवकाशस्थानकासाठी लागणार्‍या वस्तू तसेच उपग्रह ठेवलेले असे. इंधनटाकी वेगळी झाल्यानंतर त्या कक्षेतून अंतरीक्षयान मग अंतराळस्थानकाच्या कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळस्थानक व यान एकाच कक्षेत प्रवास करत असतानाच अंतराळवीर स्पेस शटलवरील यंत्रनेचा वापर करून यान अवकाशस्थानकाला जोडले जात असे, यालाच डॉकिंग असे म्हणत. त्यानंतर अंतराळवीर अवकास्थानकात पोहचत असे. एखादा उपग्रह कक्षेत पाठवण्याताना स्पेस शटल याच पद्धतीने ठरावीक कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळवीर त्याचा विशिष्ठ पोशाख घालून सोबत नेलेला उपग्रह त्या कक्षेत सोडुन परत पृथ्वीवर येत असे. याचप्रकारे हबल दुर्बिन अवकाशात पाठविण्यात आली होती व वेळोवेळी त्या कक्षेत पोहचून दुर्बिनीला पकडुन दुरूस्ती करण्यात आली होती.

* स्पेस शटलचे अपघात

१)  २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजर या यानाला उड्डाणानंतर ७३ सेकंदांनी उजव्या बाजुच्या रॉकेटमध्ये यांत्रिक बिघाड झाला व त्याचा स्फोट झाला. त्यात ते संपूर्ण यान जळून खाक झाले व त्यात सात अंतराळवीरांचा देखील मूर्त्यु झाला होता.

२)  १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया हे स्पेस शटल अंतराळस्थानकावरून परत पृथ्वीवर येत असताना पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये देखील सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला व त्यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला हिचा समावेश होता. अशाप्रकारे त्या पाच स्पेस शटल्सने १३० पेक्षा जास्त मोहिमा सन १९८१ ते २०१२ या काळात पार पडल्या. त्यात काही उपग्रह आणि ३७ वेळा अंतराळस्थानकाच्या बांधकामासाठी उड्डान घेतले होते. आता सर्व स्पेस शटल्सची निवृत्ती झाली आहे.

साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र

* संकलन * 
 शरद शिंदे. 

शुक्रवार, १५ मे, २०२०

जागतिक परिवार दिन

मित्र हो,
आज जागतिक परिवार
दिन म्हणून हे थोडेसे माझ्या मनातले...
मी माझा, माझे मला ...
हा स्वार्थ विचार झाला.
माणूस म्हणून जगताना जर आपण
हाच विचार पेरत आणि जोपासत राहिलो
तर परिवार कुटुंब ही संकल्पना नामशेष
होण्याची शक्यता आहे.
रोजचे जीवन जगताना आपल्याला
अनेकदा सहकार्याची मदतीची गरज भासते.
आपलीही कोणालातरी मदत हवी असते.
म्हणूनच समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था
आपल्या आनंदाने जगण्याचे मुख्य मार्ग आहेत.
पण केवळ आपल्याच कुटुंबाचा विचार करणे हा ही एक स्वार्थच ठरतो. संपूर्ण मानवजातीला आपलाच परिवार मानणे ही उदात्ततेची पराकोटी झाली.
     आपल्या आजूबाजूला जर आपण डोळे आणि कान उघडे ठेऊन पाहिले तर अनेक सामाजिक संस्था मानवजातीलाच आपला परिवार समजत कार्य करताना दिसतील.
यात अनाथाश्रमे ,वृद्धाश्रमे, गोशाळा, मतिमंद गतीमंद बालकांची संस्था, महिलांसाठी कार्यरत संस्था, इतकेच नव्हे तर पर्यावरण संतुलनासाठी झटणार्या संस्था मोठ्या निष्ठेने मानवी कल्याणासाठी झटत आहेत.
त्यांच्या या कार्यात आपला सहभाग किती ? कसा?  हे ज्याचे त्याने आपल्या क्षमतेनुसार ठरवावे. पण अशा कार्याला नुसत्या टाळ्या वाजवणारेच आज अधिक दिसतात ही खेदाची बाब आहे.
     आपला खारिचा वाटा आपण या पारिवारिक संस्थांना नक्कीच देवू शकत असतो. त्यासाठी फार काही नाही फक्त आपली सामाजिक जाणिव थोडी प्रगल्भ व्हायला हवी.
जग सुंदर आहे ते आणखी सुंदर नक्की करता येईल. आज जागतिक परिवार दिनी संकल्प करू. जग सारे सुंदर करू.

तुमचाच
  शरद

गुरुवार, १४ मे, २०२०

छत्रपती संभाजीराजे भोसले

* छत्रपती संभाजीराजे भोसले 
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले 

जन्म : पुरंदर किल्ला, १४ मे १६५७;
मृत्यू : तुळापूर, महाराष्ट्र), ११ मार्च १६८९;

संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

अधिकारकाळ
जानेवारी १६, इ.स. १६८१ – मार्च ११, इ.स. १६८९
राज्याभिषेक
जानेवारी १६, इ.स. १६८१
राज्यव्याप्ती
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून ते दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी -रायगड

राजब्रीदवाक्य
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी

🎯 बालपण 
     संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचेनिधन राजे लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
     अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

🎯 तारुण्य
     इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.
     शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
     दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.

🎯 छत्रपति संभाजी महाराजांचे धार्मिक धोरण
     दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, '...राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...'. युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.

संतजनांस राजाश्रय:
१. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजन्त्रीची कायमची व्यवस्था लाऊन दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)
३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले.तेथील पुजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)
४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोवेंबर १६८०)
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)
६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यास '...श्री चे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?...' अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.
७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना '...जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील...' अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.
८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी '...धर्मकार्यात खलेल न करणे..' अशा शब्दात ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून '...धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही...' असे अभिवचन दिले आहे.

सक्तीने धर्मांतरास विरोध:
     छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेन्‌री ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे;

‘That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians’

अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:
     छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरु झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफी संबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.

'आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...'

🎯 औरंगजेबाची दख्खन मोहीम
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजीच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.
दगाफटका संपादन करा
     इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

🎯 शारीरिक छळ व मृत्यू 
     त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना महाराष्ट्राने धर्मवीर ही पदवी बहाल केली.
     बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जीभ कापणे यांसारख्या शिक्षा फर्मावल्या. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .
     पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांचे डोळे काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जीभ कापण्याची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले, तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यांची जीभ तलवारीने कापली.

🎯 साहित्यिक संभाजीराजे 
     अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :

"कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥"

     याचबरोबर संभाजीराजांनी नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला.


* संकलन *
 शरद शिंदे.

मंगळवार, १२ मे, २०२०

जागतिक परिचारिका दिन

* जागतिक परिचारिका दिन -
      आज जग ज्या जैविक युद्धाचा सामना करतोय,त्या युद्धातील रणरागिणी म्हणजे आमच्या परिचारिका भगिनीं. आज त्यांच्या कार्याला.. त्यागाला.. कर्तुत्वाला नमन करण्याचा दिवस.अर्थात जागतिक परिचारिका दिन.
      रुग्णसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे १८२० हा जन्मदिन "जागतिक परिचारिका दिन" म्हणून जगभर साजरा केला जातो.आज त्यांचा जन्माला दोनशे वर्षे झाली आहेत.
      फ्लॉरेन्स नाइटिंगेल या सहकारी भगिनींसह प्रत्यक्ष युद्धातील सैनिकांच्या सेवेत सहभागी झाल्या.त्यांच्या प्रेरणेमुळे जगभर परिचारिका शिक्षणाची सुरवात झाली. महाराष्ट्रात महर्षी कर्वेंनी SNDT संस्थेच्या मार्फत या शिक्षणाचा पाया रोवला.डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यातील परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा भावनिक......दिलासा देणारा.....आत्मविश्वास वाढविणारा दुवा.
      वेदकाळापासून भारतात रुग्णसेवेचे असाधारण महत्त्व सांगितलेय.चरकसंहितेत तर विस्तृत प्रकाश टाकलाय. भारतात तर आमचा पहिला श्वास सुकर होतो तो या भगिनींमुळेच.
      मातृत्वभाव ही या भगिनींना लाभलेली दैवी देणगीच.परिस्थिती कितीही कसोटीची असो त्या रणरागिणीची सतत सेवा.. त्यागाची परंपरा आत्मविश्वासाने पार पाडतात. या भगिनींच्या सेवेला,त्यागाला शतशः नमन आणि सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!

* फ्लॉरेन्स नाइटिंगेल -
(१२ मे १८२० - १३ ऑगस्ट १९१०)
      फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो.
      फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापपासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेयर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला.
नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लॉट असेही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका यांच्यासाठी.....

स्वर्गाहुनही प्रिय आंम्हाला अमुचा सुंदर भारत देश,
आम्ही सारे एक जरीही नाना जाती नाना वेष,

या भूमीच्या आम्ही कन्या कोमल भाव मनी,
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी,
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष,

श्रीरामाचे श्रीकृष्णाचे अजुन आहे स्मरण मनास,
वीर शिवाजी प्रताप बाजी थोर आमुचा हा इतिहास_
_रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश,
वंदे मातरम्.. वंदे मातरम्.....

हिमालयापरि शीतल आम्ही आग पेटती परि उरात,
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत,
या देशाची गौरवगाथा हाच अम्हांला दे आदेश,
वंदे मातरम्.. वंदे मातरम्..

सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!

* संकलन *
 शरद शिंदे.

सोमवार, ११ मे, २०२०

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

* राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस -
     ११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 
     तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे.
     आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
     आज विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अनेक वेळा एकत्र मानले गेले असले तरी ते दोन्ही एकत्र नाहीत. विज्ञान हे फार अलीकडचे आहे, तर तंत्रज्ञान लाखो वर्षापूर्वीचे आहे. आधुनिक माणसाच्या पूर्वजांनी जेव्हा लाकूड, दगड आणि प्राण्यांची हाडे यांच्यापासून अगदी साधी शस्त्रे बनवायला सुरुवात केली आणि अग्नीचा शोध लावला, तेव्हापासून तंत्रज्ञान अस्तित्वात आहे.
     सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले.
     आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे.
     सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
     २००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
     राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.
------------------------------------------------
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र

* संकलन *
 शरद शिंदे.

रविवार, १० मे, २०२०

मदर्स डे- (Mothers Day)

* मदर्स डे- (Mothers Day)
का केला जातो मदर्स डे साजरा? काय आहे त्याच्या मागचा इतिहास अवश्य वाचा
     आपण लहानपणापासून ज्या व्यक्तीच्या सर्वात जवळ असतो ती व्यक्ती म्हणजे  आपली आई! आपल्या मनातलं ओळखणारी आपली आई! why mothers day is celebrated
Mothers Day Information in Marathi
कुठलाही हट्ट केला की तो पूर्ण होतो हा विश्वास ज्या व्यक्तीवर असतो ती व्यक्ती म्हणजे आई! लहानपणी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आई! वेळोवेळी आपल्या तोंडात येणारं नाव म्हणजे आई! आपल्याला कुठलीही जखम झाली, मग ती शरीराची असेल नाहीतर मनाची, तरी आठवते ती आपली आईच!!
     आई म्हणजे काय नाही, सांगा हो?! आपल्याला जगाची ओळख होते तिच्यामुळेच. आपण जगात येतो तिच्यामुळेच. मुलांसाठी आई काहीही करू शकते 
     आपल्या सर्वांना अशा अनेक गोष्टी माहिती आहेत की ज्यामध्ये  आईने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या  मुलांचे रक्षण केले आहे  मुलासाठी रायगडाच्या अवघड कड्यावरून उतरणारी हिरकणीची गोष्ट ही त्यापैकी एक आहे . 
     अशा आईचे उपकार कधीच कुणीही फेडू शकणार नाही. आणि हे आपणच नाही तर संपूर्ण जगानेच आईचं महत्व मान्य केले आहे.
म्हणूनच तर आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभर दरवर्षीच्या मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो.
खरंतर वर्षातले ३६५ दिवस हे आईला समर्पित करण्यासारखेच असतात. 
तरीदेखील आईच्या नावाने एखादा दिवस संपूर्ण जगभर साजरा जावा, साजरा केला जावा म्हणून दरवर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. असं का? त्यादिवशी आपण कसे, मदर्स डे हा फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर आपल्याबरोबर आईचा फोटो, आणि हॅपी मदर्स डे यावर एक दोन चार ओळी खरडल्या की मदर्स डे साजरा केला असं समजतो!
या दिवशी आईला घेऊन काहीतरी खरेदी आणि एखाद्या हॉटेलात जेवण! असं मस्त शेड्युल आपल्या मदर्स डे चं असतं. अर्थात यात वाईट काहीच नाही.
     काही जणांचा असा समज असतो की हे तर पाश्चिमात्य देशातलं फॅड आहे. आम्ही जीवनात आईला खूपच महत्त्व देतो. आम्हाला हा दिवस साजरा करायची गरज नाही,’ 
असं म्हणून दुर्लक्ष करतात. भारतात या दोन्ही प्रकारची लोकं पाहायला मिळतात.
यापैकी कुणालाही मदर्स डे का साजरा केला जातो? त्याचा इतिहास काय आहे हे माहीत नसतं. ही कल्पना नेमकी कुणाची असेल आणि कधीपासून हा दिवस साजरा केला जातोय हे माहीत नसतं.
      तसं पाहिलं तर १९०० च्या सुरुवातीलाच मदर्स डे हा अमेरिकेत चालू झाला.
अमेरिकेत सिव्हिल वॉर चालू व्हायच्या आधी ‘रिव्हीस जर्विस’ या महिलेने व्हर्जिनिया प्रांतात ‘मदर्स डे वर्क क्लब’ असा एक क्लब स्थापन केला.
ज्यामध्ये मातांनी आपल्या मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे याचं प्रशिक्षण तिथल्या बायकांना द्यायला सुरुवात केली. आणि मग जागोजागी असे अनेक क्लब सुरू झाले.
तिच्याबरोबर ‘जुलिया वॉर्ड हावे’ देखील कार्यरत होती.
नंतर अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झालं, गृहयुद्धाचा भडका उडाला. हे थांबवण्यासाठी देखील परत सगळ्या माताच एकत्र आल्या. देशातलं सिव्हिल वॉर थांबावं आणि सलोखा निर्माण व्हावा या मातांची एकत्रित शक्ती काम करू लागली.
     अमेरिकेतलं सिव्हिल वॉर थांबलं परंतु मदर्स क्लब मात्र चालूच होतं . त्यांचं कामही सुरू होतं.
म्हणूनच या सगळ्या मातांसाठी असा एखादा दिवस असावा अशी कल्पना ऍना जर्विस या रिव्हिस जार्विस यांच्या मुलीच्या कल्पनेतून आली.
ऍना जर्विस आपल्या आईचं काम पहात होती, तिच्या सोबत असणाऱ्या सगळ्या या मातांचं कामही ती पहात होती. या सगळ्या मातांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जावी इतकीच तिची इच्छा होती.
     १९०५ ला तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिला ते जास्त जाणवायला लागलं. तिचं तिच्या आईवर खूप प्रेम होतं. स्वतः ऍनाने लग्नही केलं नाही.
आईच काम ती पुढे चालवत होती. मी १९०८ मध्ये फिलाडेल्फिया मध्ये मधील एका डिपार्टमेंटल स्टोअरचे मालक जॉन वनामेकर यांनी ऍनाच्या मदर्स क्लबला आर्थिक मदत केली.
तेंव्हा तिने पहिल्यांदा मदर्स डे सेलिब्रेशन केलं. वेस्ट व्हर्जिनिया मधील ग्राफ्टन येथील एका चर्चमध्ये पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला.
     वनामेकर यांच्या मालकीच्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये देखील त्यादिवशी ‘मदर डे’ चा इव्हेंट करण्यात आला ज्याला अनेक लोकांनी उपस्थिती लावली.
पहिला मदर्स डे अशा प्रकारे यशस्वी झाल्यानंतर ऍना जर्विस हिने मदर्स डे हा संपूर्ण देशभर साजरा केला जावा अशी मागणी लावून धरली.
  ऍना जर्विस
अमेरिकेत बर्‍याचशा सुट्ट्या ह्या केवळ पुरुषांशी निगडित असून एकाही स्त्रीसाठी कुठलीही सुट्टी दिलेली नाही अशी तक्रार केली.
म्हणूनच संपूर्ण देशात मदर्स डे साजरा केला जावा यासाठी तिने सह्यांची मोहीम सुरु केली. आणि किती लोकांच्या सह्या येत आहेत हे पेपर मध्ये छापून आणायला सुरुवात केली.
तिच्या या चळवळीला यश येत होतं. १९१२ पर्यंत अमेरिकेत अनेक चर्चेसमध्ये, राज्यांमध्ये, शहरांमध्ये मदर्स डे साजरा केला जाऊ लागला.
शेवटी १९१४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे महिन्यात दुसरा रविवार हा अमेरिकेत “मदर्स डे” म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. मदर्स डे ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली.
* ऍना जर्विसच्या कल्पनेनुसार मदर्स डे म्हणजे,
      पांढरे कपडे घालून चर्चमध्ये जाणे, तिकडे काही सेवा करणे, एखाद्या आईला भेट देणे, एक हॉलमध्ये सगळे जमा होणे त्यात एखाद्या आईच्या कर्तुत्वावर भाषण करणे, ते ऐकणे, काही गाणी म्हणणे अस होत.
मात्र पुढे फुलं, भेटकार्ड, भेटवस्तू यांची रेलचेल मदर्स डे मध्ये दिसून यायला लागली.
मदर्स डे हा संपूर्ण व्यावसायिक रित्या साजरा केला जाऊ लागला ज्याची अँना जर्विसला चीड आली. आता हे थांबावं यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. मदर्स डे वर भेटकार्ड बनवणाऱ्या कंपन्यांवर तिने खटले दाखल केले. असा मदर्स डे साजरा करू नका असं तिचं म्हणणं होतं.
     गरीब मातांसाठी होणाऱ्या चॅरिटीला देखील तिने विरोध केला.आपली कितीतरी संपत्ती तिने या खटल्यांमध्ये घालवली.
१९४८ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत ती मदर्स डे ला जाहीर सुट्टी नको असं म्हणायला लागली. तिच्या मते मदर्स डे कसा साजरा करायचा हे सांगण्याचा अधिकार तिलाच होता. मदर्स डे हीची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखी ती वागायला लागली. परंतु तोपर्यंत मदर्स डे संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला. आणि आता तर मे महिन्यातील दुसरा रविवार हाच मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत फुलं, भेटकार्ड, भेटवस्तु आईला देऊन आता मदर्स डे साजरा होतो.
     त्याशिवाय एक दिवस आईला स्वयंपाक करण्यापासून सुट्टी देऊन मदर्स डे साजरा केला जातो.
     १९३४ मध्ये प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी एक स्टॅम्प आणला ज्यावर "IN MEMORY AND IN HONOR OF THE MOTHERS OF AMERICA." असं लिहिलेलं होतं.
      थायलंडमध्ये तिथल्या राणीच्या वाढ दिवसा नुसार मदर्स डे ऑगस्टमध्ये साजरा केला जातो. इथिओपिया मध्ये मदर्स डे चे काही दिवस ठरलेले आहेत, त्या दिवसांमध्ये तो साजरा केला जातो.
ज्याकाळात सगळे कुटुंब एकत्र येतात गाणे म्हणतात आणि विविध पदार्थ, पदार्थांचा आस्वाद घेतात.
      युरोप आणि ब्रिटनमध्ये याला मदरिंग संडे असं म्हटलं जातं. ग्रीस मध्ये अनेक देवता या स्त्री देवता असल्यामुळे या दिवशी त्या देवतांची पूजा केली जाते.
     आज जगभर हा मदर्स डे साजरा केला जातो तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, की त्यादिवशी फोनचं नेटवर्क इतर कोणत्याही दिवसापेक्षा सगळ्यात जास्त बिझी असते.
त्यादिवशी फुलांची विक्री जास्त होते, भेटकार्ड विक्री अधिक होते.
      अमेरिकेत त्यादिवशी प्रत्येक जण आईला भेटवस्तू देण्यासाठी किमान १८५ डॉलर्स खर्च करतो अशी तिथली आकडेवारी दर्शवते.
बाकी काही का असेना परंतु आई पोटी आपली कृतज्ञता व्यक्त करता येते, त्यासाठी तरी हा दिवस आपण आपल्या आई बरोबर साजरा केला पाहिजे.
       तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. तुमची अगदी छोटीशी कृती देखील तिला आनंद देऊन जाईल इतके नक्की.

* संकलन *
 शरद शिंदे.