पेज

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

सरणारे वर्ष मी

मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता*

*" सरणारे वर्ष मी "*

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे "हासरे"

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो "राईट" मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी "नाळ" आहे
भले होओ, बुरे होओ
मी फक्त "काळ" आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही देऊ नका
निरोप माझा घेताना
"गेट पर्यन्त" ही येऊ नका

उगवत्याला "नमस्कार"
हीच रीत येथली
विसरु नका "एक वर्ष"
साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला "खुशाल विसरा"
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या, शाप, लोभ, माया
यातले नको काही
मी माझे "काम" केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना "पुन्हा भेटु"
असे मी म्हणनार नाही
"वचन" हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
"शुभ आशीष" देऊ द्या
"सरणारे वर्ष" मी
आता मला जाऊ द्या।
                         
                                          संकलन

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं

गुरुजींना न्यायला देवानं
यमाला अर्जंट धाडलं !
न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात
चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात
एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक
तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक
यमाचं बोलणं ऐकूण गुरुजी लागले रडू
खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू
कोरोनाने पोरांची शाळा होती बंद
आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद
फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन
मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन
ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला
गुरुजींचा डान्स पाहून तो ही फार हसला
यमालाही आठवलं त्याचं बालपण
 दाटून आला गळा त्याचा गहिवरलं मन
आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून
उदया येतो म्हणत यम गेला आला पावल्या निघून
दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर
गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर
काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम
केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब
सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन
किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून 
करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती
पोरांची बी काढायची आहेत बँकेमधे खाती 
आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती
डोक्यामध्ये नुसती गणगण काय आणि किती
शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा
तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा
शेवटची ही संधी गुरुजी आज नककी देईन
पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन
गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन
आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेंशन
म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार
शाळेकडे गुरुजी झाले स्कुटरवरती स्वार
तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहितरी ध्यानात 
गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात
यम म्हटला गुरुजी आज इकडं कसं काय?
तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय
गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी
आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी
काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी
तुमच्या अशा वागण्यानं डयुटी धोक्यात येईन ना माझी 
आजच्या दिवस यमा घे रे गड्या समजून
किर्द , दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून
उदया पासून सुरु आहे c० साहेबाचा दौरा
कामाभोवती फिरतोय बघ
गुरुजी नावाचा भोवरा
परवा पासून खेळायची आहे टॅग ची पण इनिंग
पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग
नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी
लसीकरणाची ही पार पाडायची आहे जबाबदारी
पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर
नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर
कामाच्या या तानाची डोक्या  भेळ
आमच्याकडं नाही यमा  मरायलाही वेळ
खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा
कांदा मुळा भाजी आमची खडू आणि फळा
पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम
त्यांचा मधेच दिसतो रहिम त्यांच्या मधेच राम
फुकट पगार  म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव 
हरकत नाही आज माझा घेऊन टाक जीव
यमाला आलं गलबलून , सारं काही ऐकून
तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून
वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार
सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार
टाटा बाय बाय करत करत  यम गेला निघून
परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून
जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं
नरक आणि स्वर्ग इथचं आहे सगळं
कामाशी काम करून घडवा नवा भारत
कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत

                                                                                                 ( संकलन )

रविवार, २३ मे, २०२१

कोरोनाला पत्र

दुष्ट कोरोना
     अजूनही झालं नाही का तुझं समाधान? अरे राक्षसा गेल्यावर्षीच्या मार्चपासून तु सगळ्या मानव जातीला वेठीस धरलं आहे. तुझ्यामुळे आम्हाला शाळेत जाता आले नाही. वर्गात शिकायचा आनंद तर सोड पण मित्रांबरोबर शाळेच्या मैदानावरही खेळता आले नाही.तुझ्या भीतीने आईबाबा घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत. आमचं सगळं जीवनच बंदिस्त करुन टाकलस रे तु सांग ना काय मिळविलेस तू यातून?
     अरे किती छळशील रे आम्हाला. नोकरी गेल्याने बाबा चिंतेत आहेत. आमचं कसं होईल या विचाराने आई हुंदके देऊन रडतेय. पाहवत नाही रे तिचा चेहरा. मग मलाही रडू येते रे. मग बाबाच आम्हाला समजवतात. होईल सगळं ठीक म्हणून.
     तु किती क्रूर आणि कठोर आहेस रे लहान मुलांच्या आईबाबांना घेऊन जाताना. थोडाही विचार केला नाहीस. किती यातना होतील त्यांना अनाथ आणि पोरकं करताना. काहीच कसं वाटलं नाही तुला. तुझं काळीज दगडाचं आहे. त्यामुळं तुला दुःख काय असतं? हे तुला कसं कळणार. तुझ्या भीतीने माणसं जीव मुठीत धरुन जगत्यात. तु जा इथून लवकर निघून जा. घेऊ दे आम्हाला मोकळा श्वास.
     तु अनेक हसती खेळती कुटुंबे उध्वस्त केलीस. जीवाभावाची माणसं हिरावून नेलीस. कुणाची आई. कुणाचा बाप. कुणाचा भाऊ. कुणाची बहिण. तरीही अजून तुझं मन भरीत नाही. तु आमचा शत्रू आहेस. तु दिसत जरी नसलास तरी आम्ही तुला गाडल्याशिवाय राहणार नाही. हे तु लक्षात ठेव.  आम्हाला तु कमजोर समजू नकोस. एक दिवस आम्ही नक्कीच तुला हरवू. तो दिवस जवळ आलाय. तुझ्या विनाशाचा आणि आमच्या विजयाचा.

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

आपला माणूस हक्काचा माणूस

महत्त्वाचा मेसेज
प्रत्येकाने माहिती करून कुटुंबियांना देणे

शरीरात ब्लड प्रेशर किती हवे.
120 / 80 --  Normal  चांगले
130 / 85 --  Normal (Control)
140 / 90 --  High जरा वाढले
150 / 95 --  Very High खूपच जास्त
Oxygen Leval)

*ऑक्सिजन लेव्हल
ऑक्सिजन ऑक्सिमीटरने चेक केल्यावर 
ऑक्सिजन लेव्हल किती हवी..
94 - Normal चांगले
95, 96, 97  ते 100 शरीरात ऑक्सिजन लेव्हल चांगली.
90 ते 93 ऑक्सिजन लेव्हल जरा कमी
80 ते 89 ऑक्सिजन लेव्हल फार कमी
डॉक्टर यांच्या सल्ल्याने अॅडमिट होणे.

PULSE PR
72  Per Minute  (Standard) खूप चांगले.
60 --- 80 P.M. (Normal) मध्यम
90 ते 120  Pulse वाढली.

TEMPERATURE
डिजिटल थरमामीटरने चेक केल्यावर किती हवे.
92 ते 98.6  F (Fever) पर्यंत ताप नाही  (Normal)
99.0 F ताप थोडा
100 .F ते 102 F  ताप जास्त
HRCT किंवा छातीचा CT SCAN,
वरून कोरोना चे गांभीर्य कळते.
1. HRCT score: 0 - 8 सौम्य (Mild Infection).
2.HRCT score: 9 - 18 मध्यम (Moderate Infection).
3. HRCT score: 19 - 25 गंभीर (Severe Infection) .

👇
उपचार :
1. सौम्य आणि मध्यम गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो.
2. गंभीर इन्फेक्शनला ऑक्सिजनव्हेंटिलेटर ची गरज भासते.

👇
HRCT Score म्हणजे काय ?
कोरोना इन्फेक्शन मुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन 
शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी /कफ भरतो. 
छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून 
त्या पैकी किती भाग हे Infected आहे 
हे पाहून त्याचा SCORE काढतात
अर्थात जितका SCORE जास्त तितका 
ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणुन रक्तातील 
ऑक्सिजन ची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.

👇
काळजी घ्या,
घरी रहा सुरक्षित राहा.

🤝 आपला माणूस हक्काचा माणूस 🤝

Stay Home....Stay Safe

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

स्पर्धा परीक्षा इ. १ ली ते ८ वी

 विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी 
नियमित अभ्यास,
शिष्यवृत्ती परीक्षा सराव, 
नवोदय परीक्षा सराव, 
वर्णनात्मक नोंदी, 
स्वाध्यायमाला व शैक्षणिक माहिती 
उपलब्ध करून देत अहोत. 
इ. ५ वी ते इ. ८ वी मधील मुला मुलींना अत्यंत उपयुक्त आहे.
"तयारी स्पर्धा परीक्षेची ( इ.१ ते ८ वी )" या पेजला भेट द्या.
तुम्हाला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळेल.

!! घरीच रहा सुरक्षित रहा !!


Stay Home....Stay Safe

सोमवार, २९ मार्च, २०२१

१० वी १२ वी साठी प्रश्नपेढी

विद्यार्थी मित्रहो, 

आता आपल्या मोबाईल मध्ये 

कमी इंटरनेटचा वापरकोणतेही ऍ नको, 

डायरेक्ट विषयाचे प्रश्नपेढी डाऊनलोड, 

दहावी व बारावी चा अभ्यासक्रमावर प्रश्नपेढी बघा,

सर्व विषयाचे प्रश्नपेढी बोर्ड स्वरुपात आहेत. 

फोन व संगणक मधून नीट बघा 

व प्रश्नपेढी वहीत नोंदवा, 

आपल्या स्मार्ट फोन व संगणक मध्ये 

दहावी व बारावीचे सर्व विषयाच्या प्रश्नपेढी 

"इ.१० वी-१२ वी प्रश्नपेढी" या पेज वर

उपलब्ध करून दिले आहेत, 

  "हि Post इ. १० वी ते इ. १२ वी  शिकणाऱ्या 

मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे."

डाऊनलोड करण्यासाठी 

"इ.१० वी-१२ वी प्रश्नपेढी" या पेज भेट द्या.

!! घरीच रहा सुरक्षित रहा !!

Stay Home....Stay Safe

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

ऑनलाईन Salary Slip

प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार

आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप 
स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती 
म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.
(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा १३ अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा.
आणि पगार पञक पहा..
1) ऑनलाईन Salary Slip या पेज ला भेट द्या. 
2) लॉग इन पेजवर जाऊन 
Username  मध्ये तुमचा शालार्थ ID टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
3) लॉग इन केल्यानंतर Old password  ifms123 हा टाका.
New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character, Digit 
यांचा समावेश असावा.)
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  
नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे
Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची 
Pay slip निवडा डाउनलोड करण्यासाठी  Print करा.
6) एक पगार पञक काढुन पहा.


!! घरी रहा सुरक्षित रहा !!

Stay Home....Stay Safe