पेज

बुधवार, २४ मे, २०२३

ब्रदर डे

ब्रदर डे *

     दरवर्षी आपण ज्या प्रमाणे मदर्स डे, फादर्स डे, सिबलिंग डे साजरा करतो त्याच प्रमाणे ब्रदर्स डे सुद्धा साजरा केला जातो. ब्रदर डे (Brother's Day) हा दिवस प्रत्येक भावासाठी खास असतो. दरवर्षी २४ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. नावाप्रमाणेच हा दिवस भावांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. लहानपणापासून ते मोठं होई पर्यंत ज्याच्याशी आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो तो म्हणजे भाऊ. एकत्र खाण्याच्या, खेळण्याच्या, मौजमजा करण्याच्या अशा अनेक आठवणी भावाशी जोडलेल्या असतात. खरंतर आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्याच्या बरोबर शेअर करू शकतो असा एक तरी भाऊ प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. भावासोबतचे तेच क्षण आठवण्याचा आणि भावाला स्पेशल फील करून देण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने जाणून घ्या ब्रदर्स डे चा इतिहास. 

     जरी ब्रदर्स डे ची सुरुवात कशी झाली याबद्दल पुरेशी माहिती जरी नसली तरी, असे म्हटले जाते की, हा दिवस पहिल्यांदा २००५ मध्ये अलाबामा यूएसए येथील डॅनियल रोड्स यांनी साजरा केला होता. जो व्यवसायाने कलाकार आणि लेखक होता. ब्रदर्स डे च्या सुरुवातीचे श्रेय त्यांना जाते. हळुहळू या दिवसाला लोकांची पसंती मिळाली आणि तेव्हा पासून दरवर्षी २४ मे हा दिवस ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. ब्रदर्स डे चे महत्व म्हणजे हा दिवस खास भावासाठी असतो. भावाबद्दल आपल्या भावना, प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी भावाला मिठी मारून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच, भावासाठी खास भेटवस्तूही दिल्या जातात. आज ब्रदर्स डे ची लोकप्रियता अमेरिके पासून फ्रान्स, जर्मनी, भारत, चीन आणि रशिया सारख्या इतर देशांमध्ये चांगली दिसते. या सर्व देशांमध्ये २४ मे रोजी लोक आपल्या भावाबरोबर हा दिन साजरा करतात.

     वास्तविक, खऱ्या भावांव्यतिरिक्त, इतर लोक, जसे चुलत भाऊ आणि मित्र सुद्धा आपल्या आयुष्यात भावाची उणीव भरून काढू शकतात आणि ते नेहमी भावांसारखे आपल्यासाठी उभे असतात. खरे तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किमान एक तरी भाऊ असला पाहिजे, ज्याच्याकडून तो प्रामाणिक सल्ला घेऊ शकेल, आपले मन बोलू शकेल, त्याच्या सोबत मजा करू शकेल. तो भाऊ, मित्र, नातेवाईक किंवा तुमच्यासाठी खास कोणीही असू शकतो.

*संकलन : शरद शिंदे*

गणितज्ञ निकोलस कोपर्निकस

*गणितज्ञ निकोलस कोपर्निकस स्मृतिदिन*

जन्म - १९ फेब्रुवारी १४७३ (पोलंड)
स्मृती- २४ मे १५४३

निकोलस कोपर्निकस हे पोलंड मधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य पृथ्वी भोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला. कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते. दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते. कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले.

********************************