🌴पर्यावरण प्रतिज्ञा🌴
भारत माझा देश आहे. ही भारतभूमी वैविध्यपूर्ण वनसंपदेने समृद्ध आहे. या भारतभूमीत वसलेले हिमालय, जंगले, पर्वत, नद्या तळी, सरोवरे, धरणे, ही आधुनिक भारताची तीर्थस्थाने आहेत. या भारतभूमीतील समृद्ध आणि सुंदर निसर्गाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीन. मी एकही झाड तोडणार नाही, या उलट मी माझ्या वाढदिवसाला नवीन झाड लावीन. मी माझ्या घरात छपरावर पडणाऱ्या प्रत्येक थेंब माझ्या अंगणातच जिरवीन. पाणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. मी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करीन. वीजबचतीसाठी मी कटिबद्ध आहे. आवश्यक नसतांना मी पंखे, लाईट लावणार नाही. मी घरातला कचरा कचराकुंडीतच टाकेन. मी प्लॅस्टिक ची पिशवी न वापरता कागदी किंवा कापडी पिशवी वापरेण. मी माझ्या घरातील टी. व्ही. चा आवाज कमी ठेवीन. मी तंबाखू, गुटखा, जर्दा, धूम्रपान आदी व्यसन करणार नाही, व दुसऱ्याला देखील व्यसन करू देणार नाही. मी माझ्या वागणुकीने जल, वायू, ध्वनी, प्रदूषण होऊ देणार नाही. मी भारताचा जबाबदार नागरिक असल्याने कोरोना या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन मास्क, विशिष्ट अंतर ठेवीन. तसेच दररोज योगा, व्यायाम करून मी माझे आरोग्य चांगले ठेवीन. आणि दुसऱ्यांना चांगल्या आरोग्याच्या सवयी विषयी जनजागृती करेन. मी माझ्या पर्यावरणाचे सदैव रक्षण करीन.
जय हिंद, जय भारत.
जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा